यूएइमध्ये ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील नर्सिंग टीम सेवा देण्यासाठी हजर

Posted on : Jan 23, 2021

Share

हेल्थकेअरच्या पथकात कोल्हापुरातील दोघींचा समावेश. संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तेथे १८ हजारांहून अधिक रूग्ण असल्याने त्यांनी भारताकडे मदत मागितली. त्यानुसार अस्टर डीएम हेल्यकेअरने तेथे सेवा देण्यासाठी ८८ परिचारिकांची टीम पाठवली आहे. या पथकात कोल्हापुरातील अस्टर आधार हॉस्पिटलमधील दीपिका खवले, वर्षा कानिटकर यांचा समावेश आहे. हे पथक सहा महिने तेथे कार्यरत राहणार आहे, अशी माहिती अँस्टर डीएम हेल्थकेअरचे - प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ. हरीश पिल्लाई यांनी दिली. अस्टर आधार हॉस्पिटलमध्ये त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदारे संवाद साधला.

प्रतिनिधी कोल्हापूर